Advertisement

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार प्रति शिर्डी !

येत्या १४-१५ आॅक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये २ दिवसांच्या 'श्री साई महासमाधी शताब्दी संमेलना'चं आयोजन करण्यात आलं आहे. इथं येऊन भाविकांना शिर्डीसारखं वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार प्रति शिर्डी !
SHARES

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाण्याची इच्छा आहे, परंतु काही अडचणींमुळे जाणं शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १४-१५ आॅक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये २ दिवसांच्या 'श्री साई महासमाधी शताब्दी संमेलना'चं आयोजन करण्यात आलं आहे. इथं येऊन भाविकांना शिर्डीसारखं वातावरण अनुभवायला मिळणार आहे. दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने हे संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला अंदाजे दीड लाख साई भक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


संमेलनाचं आयोजन कशासाठी?

साईबाबांनी शिर्डी इथं ज्या दिवशी देह ठेवला, त्या दिवसाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 'श्री साई भक्त मंडळा'च्या वतीने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.




काय असणार संमेलनात?

या संमेलनात श्री साईसच्चरीत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ आणि श्री गजानन महाराज विजय ग्रंथ यांचं अखंड पारायण होणार आहे. मुंबईतील साई मंडळे आणि साई मंदिरांचेही एक छोटेखानी संमेलन यावेळी होणार आहे. असं संमेलन मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने भाविकांनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.


शिवाजी पार्क हा मुंबईचा सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू मानला जातो. याठिकाणी होणारे हे २ दिवसीय श्री साई महासमाधी शताब्दी संमेलन ही साई भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात खारीचा वाटा उचलण्याची मिळालेली संधी, हे मी माझे भाग्य समजतो.
- राहुल शेवाळे, खासदार, दक्षिण- मध्य मुंबई


सदगुरू साईंच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने साई भक्तांना साईंची अप्रत्यक्षरीत्या सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या सोहळ्यात मुंबईतील ६० हून अधिक साई मंडळे सहभागी होतील, असा अंदाज आहे.
- सच्छिदानंद अप्पा, आयोजक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा