Advertisement

सिद्धिविनायकाचं दर्शन ५ दिवस बंद


सिद्धिविनायकाचं दर्शन ५ दिवस बंद
SHARES

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन पुढील ५ दिवस बंद राहणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टने दिली. माघी गणेशोत्सवाआधी मूर्तीला शेंदूर लेपन करण्यासाठी ही दर्शन सुविधा बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने दिली.



रविवारपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्याआधी गणेशमूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे १० जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत सिद्धिविनायकाचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. असं असलं तरी मोठ्या भक्तीभावानं मंदिरात येणाऱ्या भाविकांची निराशा होऊ नये म्हणून या ५ दिवसांच्या काळात गणेशाच्या प्रतिमूर्तीचं दर्शन या भाविकांना खुलं करून देण्यात येईल, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

येत्या सोमवारी १५ जानेवारीपासून पूजा आणि आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांना गाभाऱ्यातून सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येईल, असंही बांदेकर यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा