Advertisement

डोळ्याला पट्टी बांधून साकारल्या 3 लाखांहून अधिक मूर्ती!


SHARES

तुम्ही कधी कोणाला डोळे बंद करून गणपतीची मूर्ती साकारताना पाहिलं आहे? हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल ना? पण हे शक्य केलंय मुंबईत राहणाऱ्या रमा शहा यांनी! गेल्या १७ वर्षांपासून त्या डोळ्यांना पट्टी बांधून गणपतीची मूर्ती साकारत आहेत आणि आत्तापर्यंत त्यांच्या तब्बल ३ लाख ७८ हजार मूर्ती बनवून झाल्या आहेत. 

लग्नानंतर मार्च २००० मध्ये रमा शहा यांना स्वप्नात गणेशाची हिरे, माणिक, मोती जडवलेली मूर्ती दिसली. त्यानंतर सतत त्यांच्या मनात गणपतीची मूर्ती बनवण्याची जिज्ञासा जागृत झाली. ही प्रेरणा घेऊनच त्यांनी मूर्ती बनवण्यास सुरवात केली आणि त्याच कलेमुळे त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने वेगळे वळण मिळाले, असं रामा शहा सांगतात.

त्यांनी बनवलेल्या मूर्तींची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि वर्ल्ड रेकॉर्ड अकॅडेमी U.S.A. मध्ये झाली आहे. तसेच बऱ्याच पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा