Advertisement

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ५२०० जागा वाढल्या

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रकियेसाठी यावर्षी मुंबई महानगर क्षेत्रात ८४९ काॅलेजांनी मुंबई उपसंचालक विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यात ३५ नव्या ज्युनिअर काॅलेजांचा देखील समावेश आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ५२०० जागा वाढल्या
SHARES

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रकियेसाठी यावर्षी मुंबई महानगर क्षेत्रात ८४९ काॅलेजांनी मुंबई उपसंचालक विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यात ३५ नव्या ज्युनिअर काॅलेजांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात तिन्ही शाखा मिळून ५२०० जागा वाढल्या आहेत. यामध्ये ठाणे विभागातील सर्वाधिक ३६०० जागांचा समावेश आहे.  

 नोंदणी करा

दहवीचे निकाल लागताच विद्यार्थी, पालकांची आॅनलाईन प्रवेशासाठी धावपळ सुरू होते. त्याआधी अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी तिन्ही शाखांतील ज्युनिअर काॅलेजांना १५ मे पर्यंत मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अंबरनाथ आणि पनवेलमधील काॅलेजांचा समावेश आहे.   

 ३५ नवे काॅलेज

त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील ८४९ काॅलेजांनी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. त्यातील ८१४ काॅलेज जुनी असून ३५ नव्या काॅलेजचा समावेश आहे. त्यातील २० काॅलेजांचा समावेश आहे. त्यानुसार यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ५२०० जास्त जागा उपलब्ध होणार आहेत. त्यात आर्ट्ससाठी १०४०, सायन्ससाठी २१६० आणि काॅमर्ससाठी २ हजार जागांचा समावेश आहे. 

 

प्रवेशासाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण जागा

  • कला- ३६, ३६०
  • वाणिज्य- १, ६७,३३०
  • विज्ञान- ९६, ९३०



हेही वाचा-

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांना कात्री, मुंबईतील काॅलेज १२ दिवस आधीच होणार सुरू

कल्याण उपकेंद्रात इंजिनिअरिंग अभ्यासक्रम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा