Advertisement

आधारकार्ड नसेल तरी विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार


आधारकार्ड नसेल तरी विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार
SHARES

आधारकार्ड नाही म्हणून शाळेमध्ये प्रवेश नाकारणे अवैध असल्याचं विशेष ओळख क्रमांक प्राधिकरणानं (यूआयडीएआय) नुकतचं स्पष्ट केल आहे. या निर्णयामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शाळांनी स्थानिक बँका, टपाल कार्यालय, राज्य शैक्षणिक विभाग आणि जिल्हा व्यवस्थापनाशी समन्वय साधून आधार काढण्यासाठी आणि आधार कार्डाचं नूतनीकरण करण्यासाठी मदत करावी अशी सूचना दिली आहे.


मुख्य सचिवांना पत्र

केंद्र सरकारतर्फे बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी, नवं सीम कार्ड, गॅस जोडणी, शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलं आहे. मात्र अनेकदा काही शाळांमध्ये आधार कार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. त्यामुळंच यूआयडीआयकडून आधारकार्ड नसेल तरी शाळेत प्रवेश घेता येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंबंधीच पत्र सर्व राज्याच्या मुख्य सचिवांकडेही पाठवण्यात आलं आहे.

आधारमुळे कोणतीही मुले लाभापासून वंचित राहू नये अथवा त्यांचे हक्क डावलले जाऊ नयेत अस या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अशाप्रकारे शाळेत प्रवेश नाकरणं अवैध आहे आणि कायदाअंतर्गत त्याला परवानगी नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.



हेही वाचा-

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'साठी ८४ हजार जागा उपलब्ध

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांकडून सरकारची महाआरती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा