Advertisement

विद्यार्थी देणार तंबाखूमुक्तीचा संदेश; २५ हजार शाळांमध्ये तंबाखूविरोधी मोहीम

शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन यांनी संयुक्तरित्या प्लेज फॉर लाईफ हे अभियान सुरू केलं अाहे. तंबाखूविरोधी मोहिमेत राज्यातील ८ जिल्ह्यांतील २५ हजार शाळांमधील २६ लाख विद्यार्थी तंबाखू सेवनापासून दूर रहा, असा संदेश देणार आहेत

विद्यार्थी देणार तंबाखूमुक्तीचा संदेश; २५ हजार शाळांमध्ये तंबाखूविरोधी मोहीम
SHARES

मी माझं कुटुंब आणि शाळा नेहमी तंबाखूमुक्त ठेवेन, अशी प्रतिज्ञा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घेतली असून राज्यातील २५ हजार शाळांमध्ये तंबाखूविरोधी मोहिमेला सुरूवात झाली आहे. राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन यांनी संयुक्तरित्या प्लेज फॉर लाईफ हे अभियान सुरू केलं अाहे.  तंबाखूविरोधी मोहिमेत राज्यातील ८ जिल्ह्यांतील २५ हजार शाळांमधील २६ लाख विद्यार्थी तंबाखू सेवनापासून दूर रहा, असा संदेश देणार आहेत


प्लेज फॉर लाईफ

तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढत आहे. देशभरात होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूला तोंडाचा कर्करोग कारणीभूत अाहे. धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं महाराष्ट्रात दरवर्षी ७२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळं तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नका असा संदेश देण्यासाठी संबंध हेल्थ फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट आणि केअरिंग फ्रेंड्स या संस्थांनी एकत्र येत कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात राज्यात राबण्यात येणाऱ्या प्लेज फॉर लाईफ या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं.


अनेक शाळांबाहेर तंबाखू विक्रेत्यांची दुकानं आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व्यसनाधीन होताना  दिसत आहेत. याचं गांभीर्य लक्षात घेत शालेय शिक्षण विभागानं शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१५ पासून मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत अनेक शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यात यश मिळालं असलं तरी अद्याप काही ठिकाणी खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्लेज फॉर लाईफ हे अभियान राबवलं जातं आहे. या अभियानाद्वारे विद्यार्थी स्वत: या मोहिमेत सहभागी होत तंबाखू सोडण्याचं संदेश देताना दिसत आहे.
 - दीपक छिब्बा, प्रमुख, हेल्थ फाऊंडेशन महाराष्ट्र विभाग



हेही वाचा -

'त्या' ८३३ विद्यार्थ्यांचं राज ठाकरेंना साकडं 

असं' आहे दहावीचं संभाव्य वेळापत्रक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा