Advertisement

आयटीआय उतीर्ण झालेल्या 'इतक्या' विद्यार्थ्यांना अॅप्रेंटिशिप

आयटीआय उत्तीर्ण झालेल्या ५४ हजार ५२५ विद्यार्थ्यांना अ‍ॅप्रेंटिशिप (Apprenticeships) मिळावी यासाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) करण्यात आली आहे.

आयटीआय उतीर्ण झालेल्या 'इतक्या' विद्यार्थ्यांना अॅप्रेंटिशिप
SHARES

मागील वर्षभरात आयटीआय (ITI) उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) महत्वाची बातमी आहे. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या ५४ हजार ५२५ विद्यार्थ्यांना अ‍ॅप्रेंटिशिप (Apprenticeships) मिळावी यासाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचं राज्यभरातील विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षणही सुरू झालं असल्याची माहिती मिळते. 

कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी केंद्रानं सर्वाधिक १ लाखाचं उद्दिष्ट महाराष्ट्राला (Maharashtra) दिलं आहे. तसंच, हे उद्दिष्ट व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानं (Directorate of Business Education and Training) पूर्ण करण्याचं ठरविलं आहे. आयटीआय उत्तीर्ण (ITI Pass) विद्यार्थ्यांना केंद्राची प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही उद्योगाला कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्याचं सर्वांत महत्त्वाचं स्रोत आहे.

हेही वाचा - ‘त्या’ २७ गावांची वेगळी नगरपालिका करा, मनसे आमदाराने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

दिलेल्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण पूर्णत्वाच्या कालावधीनुसार, त्या प्रशिक्षणार्थीला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या निधीतून विद्यावेतनही देण्यात येतं. या योजनेसाठी केंद्रानं राज्यासाठी १९ कोटी ७६ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.

हेही वाचा - सर्व पायाभूत सुविधा प्रवाशांना देण्यात याव्यात- अनिल परब

मागील ४ वर्षांत ६ कोटींचा निधी प्रतिपूर्तीसाठी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून तब्बल १५ लाख ६९७ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. गेल्या ४ वर्षांत राज्यात १ लाख ४५ हजार ४१० विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २०१९ मध्ये मार्च पासून तब्बल ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारनं लक्ष ठरवून दिलेल्या २ लाख ६० हजार प्रशिक्षणार्थींपैकी तब्बल १ लाख हे उद्दिष्ट्य महाराष्ट्राला देण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना व्हायरस: तिघा संशयितांना घरी सोडलं

त्या मागोमाग ५५ हजारांचं लक्ष गुजरात राज्याला देण्यात आलं आहे. केंद्र सरकारने दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.

अ‍ॅप्रेटिशिप 
ऑनलाइन
मे
४,१०८
जून
३,५६१
जुलै
४,१४९
ऑगस्ट
५,१४२
सप्टेंबर
४,०२७
ऑक्टोंबर
२,१२३
नोव्हेंबर
१८,९६३
डिसेंबर
७,९६७
एकूण
५४,५२५



हेही वाचा -

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

बजेट २०२०: नोकरदारांना मोठा दिलासा, ‘अशी’ आहे नवीन कररचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा