Advertisement

दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'नो होमवर्क'

केंद्र सरकारनं पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना 'होमवर्क' देणं बंद करावं, अशी सूचना सीबीएसई शाळांना केली होती. सरसकट सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना होमवर्क देण्यात येत नसला, तरी काही शाळांमध्ये अजूनही होमवर्क देण्यात येत असल्याने सीबीएसईनं सोमवारी १३ ऑगस्टला परिपत्रक काढलं.

दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'नो होमवर्क'
SHARES

शाळांनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना होमवर्क देऊ नये, असे आदेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नं काही महिन्यांपूर्वी दिले होते. यासंबंधीचं परिपत्रक नुकतचं 'सीबीएसई'ने काढलं असून हे आदेश देशभरातील सर्व शाळांना बंधनकारक असणार आहेत.


मद्रास हायकोर्टाचे आदेश

इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालपणाचा आनंद लुटता यावा, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा ताण येऊ नये यासाठी त्यांना 'होमवर्क' न देण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्याचे निर्देश मद्रास हायकोर्टानं केंद्र सरकारला दिले होते.


सीबीएसईचं परिपत्रक

त्यानुसार केंद्र सरकारनं पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना 'होमवर्क' देणं बंद करावं, अशी सूचना सीबीएसई शाळांना केली होती. सरसकट सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना होमवर्क देण्यात येत नसला, तरी काही शाळांमध्ये अजूनही होमवर्क देण्यात येत असल्याने सीबीएसईनं सोमवारी १३ ऑगस्टला हे परिपत्रक काढलं.


काय आहे परिपत्रकात?

या परिपत्रकानुसार, मुंबईसह इतरत्र सीबीएसईच्या शाळेत विद्यार्थ्यांना होमवर्क देण्यात येणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक व शिक्षकांनी घ्यावी. विद्यार्थ्यांना शाळेत दबावाखाली नव्हे, तर हसत खेळतच शिक्षण देण्यात यावं. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कसं कमी राहिल याकडेही शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे, अशा सूचना या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत.


आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना होमवर्क देण्यात येत नसला, तरी देखील आम्ही चित्रकला, हस्तकला यांसारख्या हलक्या अॅक्टिव्हिटीज त्यांना देतो. या अॅक्टिव्हिटी केल्यानं त्यांना शिकण्यात रस निर्माण होतो. विद्यार्थी हसत खेळत शिकतात.
- तन्वी त्रिवेदी, शिक्षिका, छबिलदास हायस्कूल



हेही वाचा-

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा