Advertisement

ATKT Exam: १५ दिवस होऊनही एटीकेटीवर निर्णय नाहीच- आशिष शेलार

उच्च शिक्षण मंत्र्यांनी ना त्यावर बैठक घेतली? ना विद्यापीठात कसलंच "योग्य सूत्र" ठरलं? "चमत्कारा"ची वाट पाहणाऱ्यांचा सगळा हा "चमत्कारिक"कारभार, असं आशिष शेलार म्हणाले.

ATKT Exam: १५ दिवस होऊनही एटीकेटीवर निर्णय नाहीच- आशिष शेलार
SHARES

व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एटीकेटी/बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांचा निर्णय २ ते ३ दिवसांत घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. परंतु १५ दिवस होऊनही (bjp leader mla ashish shelar slams maharashtra higher education minister uday samant over atkt exams) या विद्यार्थ्यांबाबत निर्णय न झाल्याने भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

आशिष शेलार यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय काढून १५ दिवस झाले. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांनी ना त्यावर बैठक घेतली? ना विद्यापीठात कसलंच "योग्य सूत्र" ठरलं? "चमत्कारा"ची वाट पाहणाऱ्यांचा सगळा हा "चमत्कारिक"कारभार! वाचव रे बा, विठ्ठला!! असं म्हणत शेलार यांनी विठ्ठलालाच साकडं घातलं आहे. 

हेही वाचा - BA, Bsc आणि Bcom च्या परीक्षा होणार नाहीच- उदय सामंत

बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार १९ जून २०२० रोजी केली होती. फेसबुक लाइव्हद्वारे साधलेल्या संवादात उदय सामंत म्हणाले की, अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्रातील परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवं असल्यास, त्यांना तसं लेखी लिहून द्यावं लागेल. त्यानंतर त्यांना सरासरी गुणांच्या आधारे गुणपत्रिका दिली जाईल. 

तसंच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनाही विद्यापीठाला लेखी लिहून द्यावं लागेल. त्यानंतर विद्यापीठाकडून या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. असाच निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही घेण्यात आला आहे. परंतु या अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था राज्यात नसल्याने त्यांना परीक्षा रद्द करण्याची विनंती करण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

सोबतच एटीकेटी आणि बॅकलाॅगच्या परीक्षांबाबत संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.

हेही वाचा - परीक्षा रद्द; तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा