CBSE पेपरफुटी: १० वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, १२ वीची पुन्हा परीक्षा

सीबीएससी दहावीची फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास केवळ दिल्ली आणि हरियाणा या दोनच राज्यांत जुलै महिन्यात घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढणार असणार, तरी मुंबईसह महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • CBSE पेपरफुटी: १० वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, १२ वीची पुन्हा परीक्षा
SHARE

सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय येत्या १५ दिवसांत घेतला जाईल, असं केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी शुक्रवारी सांगितलं.


जुलैत फेरपरीक्षा

ही फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास केवळ दिल्ली आणि हरियाणा या दोनच राज्यांत जुलै महिन्यात घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढणार असणार, तरी मुंबईसह महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तपशील संकेतस्थळावर

सीबीएसईच्या परीक्षेतील काही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)ने केली होती. या फेरपरीक्षेची माहिती देणारे परिपत्रक 'सीबीएसई'ने बुधवारी जारी केलं आणि या परीक्षांच्या तारखा व इतर तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल, असं सांगितलं.


राज यांची टीका

दरम्यान प्रश्‍नपत्रिका फुटल्या हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक मान्य करायचं सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 'सीबीएसई'चे दोन पेपर फुटल्यामुळे या विषयांच्या पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्याविरोधात टीकेचा सूर उमटला आहे. राज ठाकरे यांनीही शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली होती.हेही वाचा-

विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रामध्ये द्या सरसकट ७ गुण- राष्ट्रवादीची मागणी

दहावीचा पेपर पुन्हा फुटला

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या