Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या ढासळणाऱ्या दर्जाला राज्यपाल जबाबदार- सचिन सावंत

मुंबई विद्यापीठाच्या या दुरावस्थेला राज्यातील फडणवीस सरकार आणि राज्यपाल जबाबदार असून लाखो विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे भविष्य चुकीच्या हातात आहे, अशी टीका बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या ढासळणाऱ्या दर्जाला राज्यपाल जबाबदार- सचिन सावंत
SHARES

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शिक्षण संस्थाच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक दीडशेपेक्षा खाली गेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या दुरावस्थेला राज्यातील फडणवीस सरकार आणि राज्यपाल जबाबदार असून लाखो विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे भविष्य चुकीच्या हातात आहे, अशी टीका बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.


परिस्थिती बदलली

देशातील अनेक नामवंत व्यक्तीमत्त्वांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलं. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाची पदवी घेतल्याचा अभिमान अनेकांना होता, तशी परिस्थिती आता राहिली नाही याचं दुःख होत असल्याचं सावंत म्हणाले. जवळपास ८ लाख विद्यार्थीसंख्या असलेल्या या विद्यापीठात गेल्या दोन-तीन वर्षापासून परीक्षा पद्धती, निकालाची प्रक्रिया आणि शिक्षणाच्या दर्जात सातत्याने घसरण सुरु असल्याचा आरोप सावंत यांनी केला.


भ्रष्टाचार बोकाळला

राज्यातील सरकार पूर्णपणे अकार्यक्षम असून सरकारच्या चुकीची धोरणे, सर्वच संस्थात राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाशी संबंधीत लोकांच्या नियुक्त्या करण्याचा लावलेला सपाटा आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळेच राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून राज्यभरात शिक्षक आणि विद्यार्थी महाविद्यालयात असण्यापेक्षा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत, असं सावंत म्हणाले.हेही वाचा-

बारावीच्या ८० लाख तपासलेल्या उत्तर पत्रिका पडून!

मुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा