Advertisement

अतिरिक्त शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी


अतिरिक्त शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी
SHARES

मुंबईतील उत्तर, दक्षिण व पश्चिम शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत करण्यात येणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन त्यांच्या जवळच्या शाळांमधील रिक्त जागांवर करण्यात यावं, अशी मागणी शिक्षण परिषद अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. नुकतंच या संदर्भातील मागणी करणारं पत्र अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे दिलं आहे.                                                                                                                

प्रवासातच दोन-तीन तास

गेल्यावर्षी तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यलयाची एकत्रित समायोजन प्रक्रिया घेण्यात आली होती. त्यानुसार बोरीवली, कांदिवली, अंधेरी या ठिकाणी राहणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची चेंबूरच्या शाळेतील रिक्त जागांवर भरती करण्यात आली होती. त्यामुळं या शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी वसई, विरारमधून लोकलनं दादर गाठावं लागतं. त्यानंतर दादरहून कुर्ला व कुर्ल्याहून पुन्हा हार्बरने चेंबूर असा तिन्ही लोकलचा प्रवास करावा लागतो. प्रवासातच दोन ते तीन तास जात असल्यानं शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 


एकत्रित समायोजनन नको

शिक्षकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येत्या काही दिवसात होणाऱ्या समायोजन प्रक्रियेत तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयाची एकत्रित समायोजन प्रक्रिया घेऊ नये अशी मागणी  शिक्षण परीषदनं केली आहे. तसंच यांसह इतर अतिरिक्त शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात यावं,  अशी मागणीही अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.



हेही वाचा - 

जेबीआयएमएसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरघोस पॅकेज

आॅनलाइन तक्रार नोंदवायची कुठे? इंजिनीअरिंग काॅलेजांचा नियमाला हरताळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा