Advertisement

मुंबई विद्यापिठात उत्तरपत्रिका घोटाळा; परीक्षा विभागाने परस्पर छापल्या उत्तरपत्रिका

BOEE (Board of Examination and Evaluation) बैठकीत आवश्यकता नसताना गोपनीयतेच्या नावाखाली जुन्या उत्तरपत्रिका संपल्याचं कारण देत उत्तर पत्रिकेचे मुखपृष्ठ बदलण्याचा व नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव परीक्षा विभागातर्फे ठेवण्यात आला. त्यानंतर झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांच्या चर्चेत मुखपृष्ठ बदलण्याची आवश्यकता नसल्याचं कारण देत नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव नामंजूर केला.

मुंबई विद्यापिठात उत्तरपत्रिका घोटाळा; परीक्षा विभागाने परस्पर छापल्या उत्तरपत्रिका
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापिठात अाता परस्पर नवीन उत्तरपत्रिका छापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठ कायद्यातील नियम धाब्यावर बसवत परीक्षा विभागाने परस्पर नवीन उत्तरपत्रिका छापल्याचा धक्कादायक आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. 


प्रस्ताव नामंजूर 

मुंबई विद्यापिठाच्या परीक्षा विभागामार्फत जवळपास ४५० हून अधिक परीक्षा घेतल्या जातात. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाने OSM प्रणालीचा अवलंब केला आहे.  याच पार्श्वभूमीवर ६ जून २०१८ च्या BOEE (Board of Examination and Evaluation) बैठकीत आवश्यकता नसताना गोपनीयतेच्या नावाखाली जुन्या उत्तरपत्रिका संपल्याचं कारण देत उत्तर पत्रिकेचे मुखपृष्ठ बदलण्याचा व नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव परीक्षा विभागातर्फे ठेवण्यात आला. त्यानंतर झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांच्या चर्चेत मुखपृष्ठ बदलण्याची आवश्यकता नसल्याचं कारण देत नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव नामंजूर केला.


पुन्हा प्रस्ताव

त्याशिवाय पेपर सेट करणे, OMR-Cum-Bar Coded उत्तरपत्रिका, पदवी उत्तरपत्रिका या गोपनीय कामांच्या आवश्यक बाबींच्या खरेदीकरीता नियमित खरेदी प्रक्रियेनुसार अधिक वेळ खर्ची होतो असे कारण देत पुन्हा एकदा उत्तरपत्रिका बदलाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसंच नियमित प्रक्रिया न अवलंबता Confidential Tendering करण्याची परवानगी देण्याचा प्रस्तावही परीक्षा विभागातर्फे ठेवण्यात आला. परंतु, BOEE ने हा प्रस्तावही नामंजूर केला. 


या प्रकरणातून उपस्थित झालेले मुद्दे  

  • आर्थिक व्यवहाराची परवानगी मिळवणारे परीक्षा विभागाचे दोन्ही प्रस्ताव नामंजूर झालेले असतानाही, २०१८ च्या ऑक्टोबर परिक्षेकरिता नाव असणाऱ्या नवीन उत्तरपत्रिका छापण्यात का आल्या? 
  • BOEE बैठकीत परिक्षा विभागाचा नवीन उत्तरपत्रिका न छापण्याचा प्रस्ताव नामंजूर केला असताना, परीक्षा विभागाने कोणाच्या परवानगीने उत्तरपत्रिका छापल्या.
  • १९९३ मध्ये गोपनीयतेच्या आधारे उत्तरपत्रिकेवर परिक्षार्थींचे नाव न छापण्याचा मुंबई विद्यापीठाचा निर्णय असतानाही मंजुरी नसताना उत्तरपत्रिकेवर नाव छापण्याचा हट्ट परीक्षा विभागाने का केला
  • नवीन उत्तरपत्रिका छापण्यासाठी Confidential Tendering प्रक्रिया राबविण्याची परवानगी नाकारली असताना नियमित इ-निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही.
  • नवीन उत्तरपत्रिका छापण्यास ऑर्डर देण्याचे BOEE ने नाकारले असताना, उत्तर पत्रिका छापणे अत्यावश्यकच होते तर त्याकरिता उच्चस्तरीय प्राधिकरणाकडून परवानगी घेतली होती का?


अर्थिक गैरव्यवहार 

 या सर्व प्रकरणात उत्तरपत्रिका छापण्याच्या नावाखाली अर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अारोप अभाविपचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी केला आहे. परीक्षा विभागातील गैरव्यवहाराबाबत नुकतीच अभाविप शिष्टमंडळाने विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेतली. गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती त्वरित गठीत करावी आणि या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत आताचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ओव्हाळ यांनी केली आहे.



हेही वाचा - 

पुर्नमूल्यांकनाच्या कामाशी निगडीत असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई - रविंद्र वायकर

बीएमसी शाळांमधील संगणक धुळ खात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा