Advertisement

बायफोकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर


बायफोकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर
SHARES

अकरावी बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी ७ हजार ४०६ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशास पात्र ठरले आहेत. गुरूवारी बायफोकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात अाली. यामध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ३७१ इतकी आहे. यामध्ये कला शाखेतील ११, वाणिज्य शाखेतील १४७ आणि विज्ञान शाखेतील ३ हजार २१३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 


१४ हजार ३३८ अर्ज 

अकरावी प्रवेशात बायफोकल विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातील महाविद्यालयतील २६ हजार ९०४ जागांसाठी फक्त १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये शाखानिहाय बायफोकल विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील विषयांसाठी ११ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या सर्वांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालयं मिळालं आहे. वाणिज्य शाखेतील ४४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या यादीत २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले अाहेत. याशिवाय विज्ञान शाखेतील १३ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी अर्ज असून त्यातील ७ हजार १३९ जणांना प्रवेश देण्यात आला अाहे.


२८ जूनला दुसरी  यादी 

ज्या विद्यार्थ्यांचं नाव पहिल्या फेरीत आले आहे ते सर्व विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. या विद्यार्थ्यांना शुक्रवा पर्यंत महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर २८ जूनला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार अाहे. पहिल्या फेरीच्या प्रवेशाच्या काळात बायफोकल विषय वगळता अन्य पारंपरिक शाखांत प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत असणार आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर ते बायफोकल प्रवेशातून बाद होतील व पुढे जाहीर होणाऱ्या केवळ पारंपरिक शाखेच्या प्रवेशासाठीच पात्र असतील.



हेही वाचा - 

एफवाय प्रवेशाच्या दुसऱ्या मेरीट यादीला स्थगिती

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा