Advertisement

महाविद्यालयांच्या गणपतीच्या सुट्ट्या रद्द होणार?


महाविद्यालयांच्या गणपतीच्या सुट्ट्या रद्द होणार?
SHARES

रखडलेल्या निकालांची डेडलाईन पाळण्यासाठी सुरूवातीलाच दिलेली आठवडाभराची सु्ट्टी, प्राध्यापकांवर उत्तरपत्रिका तपासणीचा दबाव, तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे टेंशन, या सगळ्या धावपळीत मुंबई विद्यापीठाचे अद्याप पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्गच सुरू झालेले नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांची गणपतीची सुट्टी रद्द होते की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल 31 जुलैपर्यंत लावावेत अशी तंबी कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिली. त्यांनतर विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना सुरुवातीला 24 ते 27 जुलै अशी सुट्टी देऊन प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या कामाला जुंपले. 25 जुलैला 1 लाख पेपर तपासूनही झाले. मात्र दरदिवशी दीड लाख पेपर तपासणी हे विद्यापीठाचे टार्गेट होते. 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावायचे होते. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांच्या सुट्टीत वाढ केली. मात्र या निर्णयामुळे प्राध्यापक नाराज झाले.

महाविद्यालयांच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, महाविद्यालयाच्या इतर सुट्ट्या कमी करून हे दिवस भरून काढले जातील, अशी प्रतिक्रिया कुलसचिव एम. . खान यांनी दिल्यामुळे प्राध्यापकांचा गणपती यावर्षी कॉलेजमध्येच साजरा होतो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले सत्र ऑक्टोबरमध्ये पूर्ण होते. त्यापूर्वी १८० दिवसांचे वर्ग चालवणे अनिवार्य असते. त्यातील काही दिवस वाया गेल्यामुळे महाविद्यालयांच्या गणपतीच्या सुट्टया रद्द करून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. ११ ऑगस्ट उजाडला, तरी अद्याप १५० हून अधिक निकाल लागायचे बाकी आहेत.



हेही वाचा

डॉ. संजय देशमुख सक्तीच्या रजेवर, राज्यपालांची नाराजी भोवली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा