Advertisement

'लॉ' कॉलेजची मनमानी, सोशल मीडियावर कॉलेजचं नाव वापरण्यास बंदी

सोमवारी अचानक विधी कॉलेजच्या प्राचार्या सुवर्णा केवले यांनी एका नोटीसीद्वारे इन्स्टाग्रामवर असणारं हे पेज बंद करण्याचं आदेश दिले आहे. १९ नोव्हेंबर रोजी ही नोटीस काढण्यात आली असून या नोटीसमध्ये या पेजच्या अॅडमिननं ताबडतोब हे पेज बंद करावं अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं नमूद करण्यात आलं आहे.

'लॉ' कॉलेजची मनमानी, सोशल मीडियावर कॉलेजचं नाव वापरण्यास बंदी
SHARES

गेल्या काही वर्षांत सर्वत्र डिजिटलायझेशनचे वारे वाहत असताना मुंबईतील सरकारी लॉ कॉलेजने मात्र कॉलेजचं नाव सोशल मीडियावर वापरू नये, अशी नोटीस काढली आहे. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं असून कॉलेजचं नाव का वापरायचं नाही? असा सवालही विद्यार्थी करत आहेत.


विरंगुळ्याचं साधन

गेल्या काही वर्षांत फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच इतर सोशल मीडियावर कन्फेशन पेज बनवण्याचा ट्रेंड आहे. या पेजवर विद्यार्थी आपल्या कॉलेजमधील गंमती-जमती, मैत्रीचे किस्से, कॅम्प्समधील एखादी लव्ह स्टोरी शेअर करत असतात. हे पेज केवळ गंमत म्हणून चालवलं जात असल्यामुळे यावरील पोस्टवर विद्यार्थी गंमतीशीर कमेंट्सही पास करत असतात. अशा प्रकारच्या पेजेसकडे विद्यार्थी विरंगुळ्याचं साधन म्हणून बघतात. काही वर्षांपूर्वी लॉ च्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर GLC mumbai confession page नावानं एक पेज सुरू केलं होतं.


पेज बंद करण्याचे आदेश

परंतु सोमवारी अचानक विधी कॉलेजच्या प्राचार्या सुवर्णा केवले यांनी एका नोटीसीद्वारे इन्स्टाग्रामवर असणारं हे पेज बंद करण्याचं आदेश दिले आहे. १९ नोव्हेंबर रोजी ही नोटीस काढण्यात आली असून या नोटीसमध्ये या पेजच्या अॅडमिननं ताबडतोब हे पेज बंद करावं अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं नमूद करण्यात आलं आहे.


अन्यथा कारवाई

त्याशिवाय यापुढं कोणत्याही विद्यार्थ्याला फेसबुक, इन्स्टाग्राम, तसचं अन्य सोशल मीडियावर कॉलेजचं नाव वापरता येणार नाही. कॉलेजचं नाव वापरायचं असल्याचं विद्यार्थ्यांना त्याबाबत कॉलेजची परवानगी घ्यावी लागेल. परवानगी न घेता नावाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या नोटीसमुळं घाबरून लॉ कॉलेजातील अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील कॉलेजच्या नावानं असणारे विविध पेज डिलिट करण्यास सुरूवात केली आहे.


भारतीय संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे, त्यानुसार प्रत्येकजण आपआपली मत कुठंही मांडू शकतो. त्यावर सरकारी लॉ कॉलेज अशाप्रकारं दबाव टाकू शकत नाही. तसचं विद्यार्थ्यांनी लॉ कॉलेजच्या नावाने सुरू केलेलं पेज डिलिट करण्यास सांगितल्यानं लॉ कॉलेजचा अशाप्रकारचा मनमानी कारभार दिसून येतं आहे. यातून विद्यार्थ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा डाव लॉ कॉलेज करत आहे.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा-

दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे २० गुण द्या, युवासेनेची मागणी

प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा