Advertisement

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर, ५४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश


अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर, ५४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
SHARES

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली अाहे. या यादीत मुंबई विभागातून ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल अाहे.  १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीसाठी अर्ज केले होते.


वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक प्रवेश 

दुसऱ्या प्रवेशप्रक्रियेतील यादीप्रमाणेच तिसऱ्या यादीतही वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक ३४ हजार ७८९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखेसाठी १४ हजार ३९८ आणि कला शाखेसाठी ४ हजार ९६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला अाहे.  परंतू, तिसऱ्या यादीत एमसीव्हीसीसाठी फक्त ५७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.  तिसऱ्या गुणवत्ता यादीत पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ७३० आहे. तर एकूण प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५४ हजार ७२७ इतकी आहे. तसंच राज्य महामंडळाच्या ५० हजार ६८० विद्यार्थ्यांना, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १ हजार ४९७ विद्यार्थ्यांना तर आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या २ हजार ५५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. 


३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान प्रवेश 

अकरावी प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवरील Centralized Allocation Result 3 या ऑप्शनला क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याला प्रवेश मिळालेल्या विद्यालयाची माहिती मिळेल. यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या ३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.


पसंतीक्रम बदलता येणार 

ज्या विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाला नसेल त्यांना मात्र चौथ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.  तसचं ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम बदलायचा असल्याच त्यांना तो बदलता येणार आहे. परंतु पसंतीक्रम बदल्यानंतर ३ ते ४ ऑगस्टपर्यंत त्याची प्रिंट काढावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलले नसतील त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम पुढील यादीसाठी ग्राह्य धरले जातील अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आली आहे. 



हेही वाचा -

रुस्तमजी शाळेचा मनमानी कारभार

विद्यापीठाचे निकाल अजूनही रखडलेलेच




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा