Advertisement

जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखांची घोषणा केली आहे.

जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
SHARES

संयुक्त प्रवेश मंडळाने सोमवारी जेईई मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मेन परीक्षेच्या  तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखांची घोषणा केली.

कोरोनामुळे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. जेईई मेनची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा आता २० जुलै पासून २५ जुलै पर्यंत होणार आहे. तर जेईई मेन चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै पासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत होईल. जेईई मेनचा निकाल ऑगस्टपर्यंत जाहीर होणार असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं. 

ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव परिक्षेचा अर्ज भरला नसेल त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रांच्या परिक्षेसाठी ८ जुलैपर्यत अर्ज भरता येणार आहे. तर चौथ्या सत्रासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना ९ ते १२ जुलै दरम्यान अर्ज भरता येणार आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडता येणार आहेत. 

या परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी ६.८० लाख आणि चौथ्या सत्रासाठी ६.०९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुरुवातीला देशातील २३२ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण आता ती ३३४ शहरांमध्ये होणार आहे. या परीक्षेच्या प्रत्येक शिफ्टमध्ये परीक्षा केंद्रांची संख्या ६६० हून ८२८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा