Advertisement

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे जावे व त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी हे वेळापत्रक ४ महिने आधी जाहीर करण्यात येत असल्याचं मंडळाने म्हटलं आहे. हे संभाव्य वेळापत्रक असेल.

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे. मंडळाने दोन्ही परिक्षांचं सविस्तर वेळापत्रक mahahsscboard.in या वेबसाइटवर जाहीर केलं आहे.

वेळापत्रकानुसार, बारावीची परीक्षा मंगळवार १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन बुधवार  १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे. तररिक्षा दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्च २०२० रोजी सुरू होऊन सोमवार २३ मार्च रोजी संपणार आहे.  प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळवले जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे जावे व त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी हे वेळापत्रक ४ महिने आधी जाहीर करण्यात येत असल्याचं मंडळाने म्हटलं आहे. हे संभाव्य वेळापत्रक असेल. छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना नंतर देण्यात येईल, असंही मंडळाने स्पष्ट केलंं आहे. अन्य वेबसाइट्स, व्हॉट्सअॅप व इतर सोशल माध्यमांतून प्रसिद्ध वा व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केलं आहे.



हेही वाचा -
दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात


रोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा