Advertisement

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटीबद्ध- तावडे

शिक्षणामध्ये महाराष्ट्र देशात १६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. साडेतीन वर्षांत कुणाच्या नजरेत येणार नाही, अशा छोटया छोट्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, मात्र या छोट्या छोट्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठे बदल झाले. उदा. अंध विद्यार्थ्यांना मोठ्या आकाराची पुस्तकं उपलब्ध करून दिली, ही बाब फार मोठी नाही. परंतु त्यामुळे अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेडल्याचं तावडे म्हणाले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटीबद्ध- तावडे
SHARES

सत्तेत आल्यापासून राज्यातील बहुसंख्यांक, अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तळागाळातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं. विधानपरिषदेत २६० अनव्ये शिक्षणावर चर्चा करण्यात आली. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

शिक्षणामध्ये महाराष्ट्र देशात १६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. साडेतीन वर्षांत कुणाच्या नजरेत येणार नाही, अशा छोटया छोट्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, मात्र या छोट्या छोट्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठे बदल झाले. उदा. अंध विद्यार्थ्यांना मोठ्या आकाराची पुस्तकं उपलब्ध करून दिली, ही बाब फार मोठी नाही. परंतु त्यामुळे अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेडल्याचं तावडे म्हणाले.

कलागुणांना वाव

शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या कलचाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. शिक्षकांचं काम ऑनलाइन केल्याने कामकाजात सुसूत्रता आली. बोर्ड परीक्षा नापास झाल्यानंतर लगेच फेर परीक्षा घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेलं नाही, हा धाडसी निर्णय शासनाने घेतला.

शिक्षकांवर अन्याय नाही

शिक्षकांना शंभर टक्के अनुदान देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. त्या दृष्टीने २० टक्के अनुदान जाहीर केलं असलं, तरी यापुढेही टप्याटप्याने अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षकांवर अन्याय होईल, अशी कोणतीही गोष्ट सरकार करणार नाही, असा विश्वास शिक्षणमंत्री यांनी दिला.

तरुणाई वाऱ्यावर

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी तरुणांनी भाजपाला सत्ता मिळाल्यास बेरोजगारी कमी होऊन आपल्या हाताला रोजगार मिळेल या आशेने सत्तेत बसवलं. मात्र सत्तेत आल्यानंतर या सरकारने तरुणाईला वाऱ्यावर सोडलं. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पोलिस भरतीची पदे कमी करण्यात आली आहेत. एमपीएससी परीक्षेत बोगस उमेदवार बसविण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

हेही वाचा-

सीबीएसईचा १० वी, १२ वीचा पेपर फुटला, पुन्हा होणार परीक्षा

एमपीएससी, यूपीएएसीच्या उमेदवारांची लूट- विनोद तावडे

विद्यार्थ्यांनो, आता सुट्टी करा एन्जॉय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा