Advertisement

राज्य सरकार २ कोटी विद्यार्थ्यांचा काढणार विमा

बऱ्याचदा आई किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट बंद होतं. अशा परिस्थितीत या मुलांवर आर्थिक ताण येऊ नये यासाठी शासनातर्फे विमा योजना सुरू केली जाणार आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचं पदवीपर्यंत शिक्षण मोफत करण्यात येईल.

राज्य सरकार २ कोटी विद्यार्थ्यांचा काढणार विमा
SHARES

आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलाचं शिक्षण थांबू नये, यासाठी सरकारकडून २ कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केेली. या विम्याचं संरक्षण विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही देण्यात येईल, असंही तावडेंनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांसाठी विमा योजना

बऱ्याचदा आई किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट बंद होतं. अशा परिस्थितीत या मुलांवर आर्थिक ताण येऊ नये यासाठी शासनातर्फे विमा योजना सुरू केली जाणार आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचं पदवीपर्यंत शिक्षण मोफत करण्यात येईल.

विमा कंपन्यांशी बोलणी

दरवर्षी जवळपास २ कोटी विद्यार्थ्यांचा विमा सरकारच्या वतीने काढला जाईल. विमा काढल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आई अथवा वडिलांचा मृत्यू झाल्यास पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च विमा कंपनीकडून केला जाईल. याबाबत विविध विमा कंपन्यांशी बोलणी सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असंही तावडे यांनी सांगितलं.

राज्यातील जवळपास २ कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवला जाणार असून त्याद्वारे विद्यार्थी व पालकांना सरंक्षण मिळणार आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

हेही वाचा-

10वीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा निकाल जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा