Advertisement

Maharashtra HSC result 2020 : गुरुवारी जाहीर होणार बारावीचा निकाल

बोर्डाचे बारावीचे निकालगुरुवारी म्हणजे १६ जुलैला (HSC result 2020) जाहीर होणार आहेत.

Maharashtra HSC result 2020 : गुरुवारी जाहीर होणार बारावीचा निकाल
SHARES

महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra state board) बोर्डाचे बारावीचे निकाल (class xii results) गुरुवारी म्हणजे १६ जुलैला (HSC result 2020) जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in  यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.

बोर्डानं बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी दुपारी १ वाजता जाहीर करायचं ठरवलं आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

यावर्षी इयत्ता बारावीच्या १३ लाखहून अधिक तर दहावीच्या १७ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल गुरुवारी तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.

CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.



हेही वाचा

CBSE 10th Result: दहावीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनो ‘महास्वयंम’वर ‘ही’ माहिती नोंदवा, अन्यथा नोंदणी रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा