Advertisement

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचे बारावी परीक्षांचे निकाल बुधवारी ३० मे २०१८ रोजी जाहीर करण्यात येईल. बारावीचा हा निकाल दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी
SHARES

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचे बारावी परीक्षांचे निकाल बुधवारी ३० मे २०१८ रोजी जाहीर करण्यात येईल. बारावीचा हा निकाल दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.


इतक्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र याला आता पूर्णविराम मिळाला असून राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेकरता राज्यातील सुमारे १५ लाख विद्यार्थी बसले आहेत.


येथे पाहता येईल निकाल 

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com/results
www.bhaskar.com

विद्यार्थ्यांना मेसेजद्वारेही निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त बीएसएनएलवर निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC असं टाईप केल्यानंतर मध्ये जागा सोडून बैठक क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.


उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्‍यक

निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्‍यक नमुना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करून गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी ३१ मे ते ९ जून या कालावधीत तो अर्ज आणि शुल्क भरून विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पूनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्‍यक आहे.

छायाप्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करून घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट आणि फेब्रुवारी ते मार्च २०१९ अशा दोनच संधी उपलब्ध असतील, असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

CBSE १०वी निकाल : चार विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ मार्क

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा