Advertisement

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० जूनपासून

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० जूनपासून
SHARES

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (amit deshmukh) यांनी दिली.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ. टी.एच. आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा  समावेश आहे.

हेही वाचा- ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर

या वैद्यकीय पदवी  परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा आधी १९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. मात्र कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लाॅकडाऊन करण्यात आल्याने या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या होत्या. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या.

त्यातच राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील अनेकांना कोरोनाची (coronavirus) बाधा झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत होती.

(MBBS and other medical exams will start from 10 june in maharashtra says amit deshmukh)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा