Advertisement

आयआयटी मुंबईत लवकरच वैद्यकीय शिक्षण

आयआयटी मुंबई आता लवकरच वैद्यकीय संशोधकही पुरवणार आहे. या संस्थेत वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचा विचार आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे निश्चितच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळणार आहे.

आयआयटी मुंबईत लवकरच वैद्यकीय शिक्षण
SHARES

जगभरातील नामांकित कंपन्यांना हुशार इंजिनीअर्स पुरवणारी आयआयटी मुंबई आता लवकरच वैद्यकीय संशोधकही पुरवणार आहे. या संस्थेत वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचा विचार आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे निश्चितच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळणार आहे.


व‌ैद्यकीय शिक्षण देण्याचा विचार

आयआयटी मुंबईला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे विशेष दर्जा देण्यात आल्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये संशोधन आणि संयुक्त शिक्षणाच्या विविध प्रयोगांना वाव देण्यासाठी आयआयटी प्रयत्नशील असणार आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयआयटी मुंबईत व‌ैद्यकीय शिक्षण देण्याचा विचार व्यक्त करण्यात येत आहे.

यासाठी काही वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या रुग्णालयांशी सहकार्य करून हा अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय आयआयटी मुंबईनं घेतला आहे. यामध्ये संबंधित वैद्यकीय शिक्षण संस्थेत वैद्यकीय आणि संशोधनाचं शिक्षण आयआयटीमध्ये दिले जाईल, असा विचार असल्याचं डॉ. देवांग खक्कर यांनी सांगितलं.


पाच वर्षात ४०० कोटीची गुंतवणूक

आयआयटीमध्ये गणित, बायोलॉजी, व्यवस्थापन विषयाचं पदवी अभ्यासक्रम त्यासोबतच इतिहास, राज्यशास्त्र, फिल्म मेकिंग यांसारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम यापुढे शिकवले जाणार आहेत. यासाठी पाच वर्षांत ४०० कोटी रुपयांची गुंतवणूकही करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत १५० अध्यापक वर्गही नेमण्यात येणार असून, सुमारे ५०० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे.


काही रुग्णालयांची प्रथमिक बोलणी सुरू

आयआयटी मुंबईत वैद्यकीय शिक्षण सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमडी विथ पीएचडी असं शिक्षण घेता येऊ शकेल, असं आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी सांगितलं. यासंदर्भात काही रुग्णालयांशी प्राथमिक बोलणी सुरू असून पुढील पंचवार्षिक योजनेत हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्यानं तो लवकरच सुरू होईल, असंही ते म्हणाले. सध्या विविध रुग्णालयांशी टायअप करण्यात येत असून येथील प्राध्यापक विविध वैद्यकीय उपकरणांवर संशोधन करत आहेत.


२ हजार २४० कोटी खर्च

पुढील पाच वर्षांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी आयआयटी तब्बल २ हजार २४० कोटी खर्च करणार आहे. यातील १ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष दर्जासाठी प्राप्त होणार आहे. सरकारकडून मिळणारे हे पैसे दरवर्षी २०० कोटी या प्रमाणे संस्थेला मिळणार आहे. या निधीमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन सुविधा आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, अशा विविध योजना सुरू करणार असल्याचं डॉ. खक्कर यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

आयआयटी बॉम्बेच्या मांसाहार वादात 'पेटा'ची उडी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा