Advertisement

सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी : वर्षा गायकवाड

राज्यात शाळा सुरू करणं एवढ्यात तरी शक्य नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी : वर्षा गायकवाड
SHARES

येत्या २१ सप्टेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी दिली होती. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात शाळा सुरू करणं एवढ्यात तरी शक्य नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं याबाबत गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. मात्र शिक्षण विभागानं राज्यातील संस्था चालक तसंच शिक्षण तज्ज्ञ यांच्या समवेत चर्चा केली. सर्वांची मतं जाणून घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही आता कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्यास हरकत घेतली आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. तुर्तास इयत्ता दहावी आणि नववी तुकड्या सुरू करण्याचा विचार नाही. शहरी भागात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न आहे. शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणं धोक्याचं आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गाईडलाईन्स देखील हाजीर करण्यात आल्या. शिवाय पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील, असं देखील नमूद करण्यात आलं होतं. पण महाराष्ट्रात शाळा सुरू होणार का? हा निर्णय राज्य सराकर घेणार आहे.   



हेही वाचा

३ ऑक्टोबरपासून होणार ‘आयडॉल’ची अंतिम वर्षांची परीक्षा

प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द, नव्याने प्रक्रिया राबवण्याचे निर्देश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा