SHARE

मुंबई विद्यापीठात सेवानिवृत्त अधिका-यांच्या पुनर्वसनावर रु 2.80/- लाखांची उधळपट्टी होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मागवलेल्या माहितीमधून हा खुलासा झालाय. 

मुंबई विद्यापीठाचे सहायक कुलसचिव विकास डवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 पैकी 9 जण मुंबई विद्यापीठातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यापैकी तीन जण राज्य शासनातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यानंतर अनिल गलगली यांनी राज्यपालांकडे तक्रार करून या नेमणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी कुलगुरुंची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या