Advertisement

आता केवळ २ निकालांची प्रतिक्षा


आता केवळ २ निकालांची प्रतिक्षा
SHARES

'तारीख पे तारीख' दिल्यानंतर मुंबई विद्यापीठाला आतापर्यंत ४७७ निकालांंपैकी ४७५ निकाल लावण्यात यश आले आहे. केवळ दोनच परीक्षांचे निकाल आता शिल्लक आहेत. टी. वाय. बी. कॉम. आयडॉल आणि एम. कॉम.च्या चौथ्या सत्राच्या निकालांचा यात समावेश आहे.  


पुनर्मूल्यांकनाचे टेंन्शन कायम

निकाल लागले तरी पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या निकालाचे टेन्शन अजूनही विद्यापीठापुढेच आहेच. यावर्षी पुनर्मूल्यांकनासाठी एकूण ५० हजार अर्ज आले आहेत. विद्यापीठाने अत्यंत घाईने निकाल लावताना त्यात असंख्य चुका केल्या. परीक्षांना गैरहजर असल्याचे दर्शवत अनेक विद्यार्थ्यांना नापास केले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याने या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता उर्वरीत दोन निकालांबरोबरच विद्यापीठापुढे पुनर्मूल्यांकाचे आव्हान आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाकडे १० हजार अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले होते.


ऑनलाईन तपासणीचा घोळ

हाताने उत्तरपत्रिका तपासणीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने असेसमेंट करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. पण त्याचे व्यवस्थापन योग्यरितीने न झाल्यामुळे विद्यापीठाची निकालासाठी धांदल उडाली. परीक्षा होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप सर्व निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले नाही.


परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नच

निकालाच्या गोंधळाचा परिणाम परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावा लागला. मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परदेशी जाण्याची संधी हुकली. तर परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या २ हजार ६३० विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने घाईने लावले.


निकालाचे प्रकरण थेट न्यायालयात

ऑनलाईन असेसमेंटचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने विद्यापीठाला खडे बोल सुनावले आणि लवकरात लवकर निकाल लावण्याचे आदेश दिले. त्यानंतरही न्यायालयाने दिलेली डेडलाईन विद्यापीठाला पाळता आली नाही. अनुक्रमे ६ सप्टेंबर आणि त्यानंतर १९ सप्टेंबर, अशी डेडलाईन न्यायालयाने विद्यापीठाला दिली. मात्र ती पाळण्यात विद्यापीठ सपशेल नापास झाले. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.



हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईच्या विरोधात एक दिवसीय उपोषण

निकालांसाठी मुंबई विद्यापीठाची पुन्हा डेडलाईन!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा