Advertisement

मराठी विषय वाचवण्यासाठी प्राध्यापक उतरले रस्त्यावर


मराठी विषय वाचवण्यासाठी प्राध्यापक उतरले रस्त्यावर
SHARES

मराठी विषय वाचवण्यासाठी के. जे. सोमय्या कॉलेजमधील प्राध्यापक बुधवारी मैदानात उतरले. के. जे. सोमय्या कॉलेजच्या प्राचार्य सुधा व्यास यांनी मराठी विषय बंद व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी वर्गात जाऊन अनेक वेळा मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना मराठी विषय सोडायला सांगितल्याची ओरड सध्या प्राचार्य करत आहेत.

प्राचार्या व्यास यांनी मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना कामावरून काढून टाकले आहे. त्याच्याविरोधात प्राध्यापकांनी हे आंदोलन केले. आंदोलन करूनही याविरोधात कोणताही निर्णय घेतला गेला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अनिल देशमुख यांनी दिला.

मराठी विषय वाचवा यासाठी अनेक लोक सध्या पुढे येत आहेत. मात्र मुळातच शाळेपासून कोणाचा आपली मातृभाषा शिकण्याकडे कल नसतो. पालक लहानपणापासून इंग्रजी माध्यमच्या शाळेत आपल्या पाल्याला घालण्यात पसंती देतात. त्यामुळे महाविद्यालयात ही मराठी विषय घेण्यास कोणाची तयारी नसते.

विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे मराठी विषय बंद करावा लागणार आहे, असाच काहीसा प्रकार सोमय्यामध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्राचार्य सुधा व्यास यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

पण कॉलेज प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. संचयमान्यतेच्या माध्यमातून कॉलेजमधील कार्यभार कमी झाल्यामुळे दोन पदापेक्षा एक पद पूर्ण वेळ दिले गेले आहे, असे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - 

...आणि त्यांनी मराठी शाळेला पुनर्जीवन दिलं!

मराठीतून एम.ए. करणारे मुकणार दोन वेतनवाढींना


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा