Advertisement

मुंबई विद्यापीठाचे आणखी ३ निकाल जाहीर


मुंबई विद्यापीठाचे आणखी ३ निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाने एप्रिल-मे २०१८ मध्ये परीक्षा घेतलेल्या बीए, बीकॉम, बीएससी या महत्त्वाच्या शाखांचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर कॉमर्स (बँकिंग अँड इन्शुरन्स), कॉमर्स (फायनाशिअल मार्केट) आणि बीएमएम या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


किती विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई विद्यापीठानं विविध परीक्षांच्या ऑनलाइन पेपर तपासणीत मुंबई विद्यापीठाला यंदा १०० टक्के गुण मिळाले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या कॉमर्स (बँकिंग अँड इन्शुरन्स) सत्र ६ या परीक्षेकरीता ६ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी होती. त्यातील ६ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल ८३.४२ टक्के लागला असून ९३४ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत.

त्याशिवाय बीकॉम (फायनांशिअल मार्केट) सत्र ६ या परीक्षेचा निकाल ८४.७६ टक्के इतका लागला असून या परीक्षेला २ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेला २ हजार ४२९ विद्यार्थी बसले होते. त्यातील २५१ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहे.

तसंच बॅचलर इन मास मीडिया (बीएमएम) या मॅनेजमेंट कोर्सचा निकालही जाहीर करण्यात आला असून त्यासाठी ४ हजार ८२२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यातील ४ हजार ७९६ जणांनी ही परीक्षा दिली असून त्यातील १ हजार ०९२ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहे. बीएमएम शाखेचा निकाल ६९.३१ टक्के लागला आहे.



हेही वाचा-

आयडॉलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास १२ जुलैपासून सुरुवात

विद्यापीठाच्या निकालांवर कुलगुरूंची करडी नजर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा