Advertisement

एमकॉम सेमिस्टर १ चा निकाल जाहीर

गुरुवारी एमकॉम सेमिस्टर एक 'चॉइस बेस' अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ६२.४८ टक्के लागला आहे. या घोषणेनंतर आता हिवाळी सत्र परीक्षांचा फक्त एकच निकाल शिल्लक असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

एमकॉम सेमिस्टर १ चा निकाल जाहीर
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी परीक्षा आणि मूल्यमापन विभागाची एकच धावपळ सुरू आहे. त्यातच गुरुवारी एमकॉम सेमिस्टर एक 'चॉइस बेस' अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ६२.४८ टक्के लागला आहे. या घोषणेनंतर आता हिवाळी सत्र परीक्षांचा फक्त एकच निकाल शिल्लक असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.


जानेवारी महिन्यात झाली परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जवळपास पूर्ण झाल्या आहेत. परंतु, अद्याप काही हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी असल्याने गेले बरेच दिवस सर्वांचं लक्ष निकालाच्या घोषणेकडे लागलं होतं. त्यानुसार अखेर गुरुवारी विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाने एमकॉम सेमिस्टर १ परीक्षेचा निकाल जाहीर केला असून जानेवारी २०१८ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.


एकूण निकाल ६२.४८ टक्के

या परीक्षेसाठी एकूण ११ हजार २१० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून त्यापैकी १० हजार ८५४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ हजार ४२ विद्यार्थी नापास झाल्याचं विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केलं. या परीक्षेचा एकूण निकाल ६२.४८ टक्के लागला असून जवळपास ८१ विद्यार्थ्यांचं निकाल राखीव ठेवण्यात आल्याचं परीक्षा विभागाने जाहीर केलं आहे.


सेमिस्टर २ साठी अद्याप प्रतीक्षा

हिवाळी सत्रांच्या एकूण निकालांपैकी हा एक महत्त्वाचा निकाल आहे. आता फक्त एमकॉम सेमिस्टर दोनचा निकाल जाहीर होणे बाकी असून लवकरच हा निकाल देखील जाहीर केला जाणार असल्याचं परीक्षा विभागाने जाहीर केलं आहे.


हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाचे उर्वरित निकालही लवकरच लागणार!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा