Advertisement

कॉमर्सनंतर आता समाजशास्त्राच्या निकालात घोळ!


कॉमर्सनंतर आता समाजशास्त्राच्या निकालात घोळ!
SHARES

मुंबई विद्यापीठाने लावलेल्या निकालाचा घोळ संपता संपत नाही. कॉमर्सच्या निकालानंतर आता समाजशास्त्राच्या निकालाचा घोळ समोर आला आहे. सोशिओलॉजीमध्ये 80 टक्के मुलं नापास झाला आहे.

हे सगळे मुंबई विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाचे विद्यार्थी आहेत. या निकालात जवळपास 80 टक्के मुलांना शून्य गुण तर उर्वरित 20 टक्के मुलांना 20 ते 30 गुण मिळाले आहेत. त्यातही काही विषयांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

निकालात झालेला घोळ लक्षात येताच विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे धाव घेतली. मात्र तिथेही त्यांची निराशाच झाली. 'जर तुम्हाला कमी गुण मिळले असे वाटत असेल तर पेपर रिचेकिंगला टाका', असे उत्तर त्यांना परीक्षा विभागाकडून देण्यात आले.

मात्र, उत्तरपत्रिका तापसनीच नीट न झाल्याचा आरोप हे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे आम्ही उत्तरपत्रिका रीचेकिंगला का द्यायच्या? रिचेकिंगचे पैसे का द्यायचे? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना विचारला.

एकीकडे लागलेल्या निकालांमध्ये घोळ आहेत, तर दुसरीकडे निकालासाठी विद्यापीठाची तारीख पे तारीख देत आहेत. आता निकालासाठी विद्यापीठाने 19 सप्टेंबर ही तारीख दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रखडलेल्या निकलासाठी आता 19 सप्टेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे.



हेही वाचा - 

निकालांसाठी विद्यापीठाचं पुन्हा नवं गाऱ्हाणं, दिली सहावी डेडलाईन

'परीक्षेला हजर असल्याचा पुरावा द्या, पास व्हा', विद्यापीठाची अजब युक्ती


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा