Advertisement

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, परीक्षेला बसूनही विद्यार्थ्यांची गैरहजेरी

परीक्षेस बसून ही एटीकेटीच्या 9 विद्यार्थ्यांची गैरहजेरी लावली आहे. हे सर्व विद्यार्थी गिरगावच्या भवन्स काँलेजचे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापिठाविरुद्ध नाराजीचा सूर आहे.

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, परीक्षेला बसूनही विद्यार्थ्यांची गैरहजेरी
SHARES

पेपर फुटीप्रकरणानंतर पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सर्वांसमोर आला आहे. परीक्षेस बसून ही एटीकेटीच्या 9 विद्यार्थ्यांची गैरहजेरी लावली आहे. हे सर्व विद्यार्थी गिरगावच्या भवन्स कॉलेजचे असल्याचं सांगितलं जात आहे.  याप्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाविरुद्ध नाराजीचा सूर आहे.


नेमकं काय घडलंं ?

गिरगावच्या भवन्स कॉलेजमधील हे 9 विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत. डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बीएससीच्या पेपर-1 आणि पेपर-2 या विषयांची एटीकेटीची परीक्षा दिली होती. परीक्षेला बसून देखील ते परीक्षेत अनउपस्थित असल्याचा शेरा देण्यात आला. ही बाब  फेब्रुवारीत विद्यार्थ्यांसमोर आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. वेळीच हा प्रकार त्यांनी संबधित विद्यापीठांच्या प्राध्यापकांच्या निदर्शनास आणून दिला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यावेळीचे पत्रक आणि शिक्षकांची सही असलेलं हॉल तिकिटही दाखवलं.  विद्यापीठाकडून कोणतीही पाऊलं उचलली जात नसल्यामुळे अखेर या मुलांनी राज्यपालांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.


या विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहिर केलेला नाही. त्यामुळे त्यांना नापास केलेलं नाही. संबधित विद्यार्थ्यांनी ते परीक्षेस उपस्थित असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. तसंच निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

विनोद मलाले, मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव 




हेही वाचा

आरटीई प्रवेशप्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, समाजशास्त्रात नाहीत नववीचे प्रश्न



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा