मुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये

राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)माध्यमातून मुंबई विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रात ३५० ग्रामवाचनालये सुरू करणार आहे. या पुस्तकांमध्ये ‘एनएसएस’ने देणगी स्वरुपात जमा केलेल्या पुस्तकांचा समावेश असेल.

मुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये
SHARES

राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)माध्यमातून मुंबई विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रात ३५० ग्रामवाचनालये सुरू करणार आहे. या ग्रामवाचनालयांत लहान मुलांसाठी मराठी व इंग्रजी भाषांमधील गोष्टींची पुस्तकं तसंच चरीत्रे, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र इ. पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतील. या पुस्तकांमध्ये ‘एनएसएस’ने देणगी स्वरुपात जमा केलेल्या पुस्तकांचा समावेश असेल. 

 ‘अशी’ असेल योजना

मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या कॉलेजांपैकी एकूण ३५० कॉलेजांमध्ये ‘एनएसएस’ कक्ष कार्यरत आहे. या उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी प्रत्येक कॉलेजाने एका गावात एक ग्राम वाचनालय सुरू करण्याचं ठरवलं आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत पालघर जिल्ह्यात २८, ठाणे जिल्ह्यात १२, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी ४ अशी एकूण ४८ ग्रामवाचनालये सुरू करण्यात आल्याची माहिती ‘एनएसएस’चे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी दिली. 

१५ ऑगस्ट २०१९ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त ३५० गावात ग्रामवाचनालये सुरू करण्यात येतील, असंही पुराणिक यांनी सांगितलं.  

शैक्षणिक विकासासाठी पुढाकार

मुंबई विद्यापीठाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव असलेल्या सिंधुदुर्गातील पोम्भुर्ले गाव दत्तक घेऊन या उपक्रमाला सुरूवात केली. या ठिकाणी विद्यापीठाने १४०० पुस्तकांचं ग्रंथालय सुरू केलं आहे. या गावाच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ नक्कीच पुढाकार घेईल. त्याचाच भाग म्हणून गावातील ग्रंथालय समृद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचं मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले. 

बऱ्याचदा पुस्तकं वाचून झाल्यानंतर ती घरीच पडून असतात. ही पुस्तकं इतरांना वाचायला मिळाल्यास इतर वाचकही समृद्ध होऊ शकेल. अशा पुस्तकांच्या देणगीतूनच ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी ग्राम वाचनालये सुरु केल्याचं पेडणेकर म्हणाले.हेही वाचा-

२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत

आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासासंबंधित विषय