Advertisement

नीट परीक्षेचा निकाल जाहीर

नीट परीक्षेचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारे सोमवारी ४ जूनला जाहीर करण्यात आला आहे. नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना cbseneet.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे.

नीट परीक्षेचा निकाल जाहीर
SHARES

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारे सोमवारी ४ जूनला जाहीर करण्यात आला आहे. नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना cbseneet.nic.in आणि cbseresults.nic.in या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे.


इतके विद्यार्थी पात्र

यंदा नीट परीक्षेचा कट ऑफ घसरला असून जनरल कॅटेगरीसाठी यावर्षी ५० टक्के म्हणजेच ७२० पैकी ११९ मार्क्स आहे. जो मागील वर्षी १३१ इतका होता. तर ओबीसी, एससी, एसटीसाठी हा कट ऑफ ४० टक्के म्हणजे ७२० पैकी ९६ मार्क्स आहे. जो मागच्या वर्षी १०७ होता. यंदा ७ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत.


कट ऑफ कमी

६ मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेसाठी सुमारे १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्रातील ३४५ केंद्रावर ही परीक्षा पार पडली होती. २७ मे रोजी सीबीएसईने NEET 2018 ची ‘आन्सर की’ जाहीर केली होती. परीक्षेनंतर तज्ज्ञांच्या मते, यंदा परीक्षा मूळातच कठीण होती, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता होती.


वेगवेगळी रँक होतील घोषित

परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर परीक्षार्थींची 'ऑल इंडिया मेरिट लिस्ट' ठरवण्यात येणार आहे. सीबीएसई सर्व परीक्षार्थ्यांची वेगवेगळी रँकसुद्धा घोषित करण्यात येईल. खरंतर नीट परीक्षेचा हा निकाल मंगळवारी ५ जूनला जाहीर होणार होता. वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी देश पातळीवरील सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात 'नीट' ची परीक्षा यंदा ६ मे रोजी घेण्यात आली होती.


हेही वाचा -

'प्रॅक्टिस पोर्टल'वर या! MHTCET, JEE, NEET परीक्षांचा सराव करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा