Advertisement

नऊ लाख विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ऑनलाइन


नऊ लाख विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ऑनलाइन
SHARES

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्रांचा यात समावेश असणार आहे.


शिक्षण मंडळाने केला करार

दरम्यान, यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जॉयदीप दत्ता यांच्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा सामंजस्य करार झाला.


सहज मिळेल प्रिंटेड कॉपी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या डिजिटल इंडियाच्या धोरणानुसार प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजिटल अथवा प्रिंटेड कॉपी सहजपणे उपलब्ध होईल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तात्काळ पडताळून पाहणे शक्य होणार आहे.



हेही वाचा

आयसीएसईचा दहावी-बारावीचा निकाल सोमवारी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा