Advertisement

इंधन दरवाढीमुळे वाढणार स्कूल बसची फी

मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल आणि वसई विरार या शहरांमध्ये जवळजवळ ८ हजार स्कूल बस धावतात. या स्कूल बसची फी प्रतिमहीना १००० ते १५०० रुपये असून यात प्रत्येकी ७५ ते १०० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

इंधन दरवाढीमुळे वाढणार स्कूल बसची फी
SHARES

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यातच मंगळवारी सलग दहाव्या दिवशी मुंबईसह उपनगरात इंधनाचे दर वाढल्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कारण येत्या ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी वाढण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.


इंधन दरवाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी ८६.५० रुपयांना मिळणारे पेट्रोल मंगळवारी ८६.७२ रुपयांना विकण्यात येत आहे. तर ७५.५४ रुपये प्रति लिटर मिळणारे डिझेलचे दर २४ तासांत ७५.७४ रुपयांवर पोहोचले आहेत. इंधन दरवाढीमुळे खर्चात वाढ झाल्याने बस मालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७५ रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


कुठे वाढणार फी?

मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल आणि वसई विरार या शहरांमध्ये जवळजवळ ८ हजार स्कूल बस धावतात. या स्कूल बसची फी प्रतिमहीना १००० ते १५०० रुपये असून यात प्रत्येकी ७५ ते १०० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.


मुंबईत आधीच आम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत अाहे. मुंबईतील खड्ड्यांमुळे बरंच इंधन वाया जातं. त्यातच दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसची फी विद्यार्थ्यामागे ७५ ते १०० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बसच्या फीमध्ये वाढ करणं गरजेचं असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन



हेही वाचा-

स्कूलबस नियमावलीचं पालन करा - उच्च न्यायालय

विनापरमिट स्कूल व्हॅनवर कारवाई करा-हायकोर्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा