Advertisement

विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षक कुटुंबासह उपोषणावर


विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षक कुटुंबासह उपोषणावर
SHARES

पंधरा वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत अाहे. अत्यल्प वेतन, सुविधांचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सुरक्षा रक्षक त्रासले आहेत. दिवस-रात्र विद्यापीठाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी परिवारासह मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये एक दिवसीय उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणास प्राध्यापकांची बुक्टू संघटनेनं पाठिंबा दिला असून काही सिनेट सदस्यही या उपोषणात सहभागी झाले आहेत. 


पगारात तफावत

गेल्या २० वर्षांपासून मुंबई विद्यापीठात रोजंदारीवर काम करणारे अनेक सुरक्षा रक्षक आहे. यापैकी जवळपास १४५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना फक्त ९ हजार ६०० रुपये मानधन देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे खासगी संस्थेमार्फत नियुक्त केलेल्या ६० सुरक्षा रक्षकांना महिन्याला २१ हजार रुपये पगार मिळत आहे. त्याशिवाय त्यांना आवश्‍यक असलेला गणवेशही स्वतः खरेदी करावा लागत आहे. 


गणवेश बदलण्यासाठी शौचालय

इतकंच नव्हे तर, महिला सुरक्षा रक्षकांना गणवेश बदलण्यासाठी कॅम्पसमध्ये एकही खोली नसल्यानं त्यांना नाईलाज म्हणून शौचालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याशिवाय कलिना कॅम्पसमधील तीनही प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौक्‍यांची अवस्था बिकट झाल्याचं वारंवार निदर्शनास आणूनही विद्यापीठातील सर्व अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत आहेत. या कारभाराविरोधात सुरक्षा रक्षक संताप व्यक्त करत आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांनी कुटुंबासह शुक्रवारी एक दिवसीय उपोषणाची हाक दिली आहे.


१९९६ सालापासून हे सुरक्षा रक्षक विद्यापीठाची सेवा करत असून विद्यापीठ त्यांना अत्यल्प वेतन देत आहे. त्याशिवाय अनेकदा त्यांना सार्वजनिक सुट्ट्याही मिळत नाहीत. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांना खासगी सुरक्षा रक्षकांप्रमाणे वेतन दिलं जावं, यासाठी बुक्‍टू संघटना वारंवार पाठपुरावा करत आहे. परंतु याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं अखेर फोर्ट कॅम्पसमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षकांसह एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांचा प्रश्‍न विद्यापीठान सोडवला नाही, तर विद्यापीठात आमरण उपोषण करु. 

 - मधु परांजपे, सरचिटणीस, बुक्‍टू संघटना



हेही वाचा - 

विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर 'टाळे लावा' आंदोलन

मुंबई विद्यापिठात उत्तरपत्रिका घोटाळा; परीक्षा विभागाने परस्पर छापल्या उत्तरपत्रिका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा