Advertisement

मुंबईत आरटीईसाठी ७,१५२ जागा उपलब्ध

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाºया आरटीई (Right to Education Act ) प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

मुंबईत आरटीईसाठी ७,१५२ जागा उपलब्ध
SHARES

 मुंबईत (mumbai) यंदा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (Right to Education Act -आरटीई) प्रवेशांसाठी ३६७ शाळांनी नोंदणी केली आहे. आरटीईमध्ये ७,१५२ जागा उपलब्ध असून यामध्ये ६५० जागा या पूर्व प्राथमिक तर पहिली इयत्तेसाठी ६,५०२ जागा उपलब्ध आहेत.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई  (Right to Education Act ) प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मुंबईत नोंदणी झालेल्या शाळांची संख्या यंदा वाढली आहे. मुंबई डिव्हायडी विभागात ७० तर पालिकेच्या २९७ शाळांनी या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामुळे पालिका शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी ५६६ तर पहिलीच्या प्रवेशासाठी ५,२०५ जागा उपलब्ध आहेत, तसेच डिव्हायडी विभागाच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या ८४, तर पहिलीच्या प्रवेशासाठी १,३४७ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ पर्यंत २१८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. 

राज्यातील ९,३२१ शाळांनी आरटीई प्रवेशांसाठी नोंदणी केली आहे. आरटीई  (Right to Education Act)प्रवेशासाठी राज्यात १,१५,०२७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचा २०१८-१९ किंवा २०१९-२० या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे, तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेतन चिठ्ठी किंवा तहसीलदारांचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • निवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, वाहन परवाना, वीज, टेलिफोन बिल, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, घरपट्टी, पासपोर्ट आदी.
  • जन्मतारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा



हेही वाचा  -

अंधेरीतील कंपनीत भीषण आग

कोरोनापासून वाचवा! मुंबईतल्या तरूणीचं भारत सरकारला आवाहन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा