Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल कुठे? ‘या’ दिवशी होणार चाचणी

दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांची कलमापन आणि अभिक्षमता चाचणी घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरातील शाळांना केल्या आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल कुठे? ‘या’ दिवशी होणार चाचणी
SHARES

दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांची कलमापन आणि अभिक्षमता चाचणी घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरातील शाळांना केल्या आहेत. त्यानुसार २७ डिसेंबर ते १८ जानेवारी २०२० या काळात या चाचण्या होणार आहेत. ही चाचणी मोबाइल आणि कॉम्युटर अशा दोन्ही पद्धतीने घेता येते. त्यामुळे शाळांना यापैकी कुठली पद्धत सोयीस्कर वाटते त्यानुसार ही चाचणी घेण्याच्या सूचनाही मंडळाने केल्या आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि श्यामची आई फाऊंडेशन या दोन संस्थांसोबत शिक्षण मंडळाने करार केला आहे. या करारानुसार राज्यातील विविध शाळांमध्ये ही चाचणी घेण्यात येईल. गेल्यावर्षी मोबाइलचा वापर करुन ही चाचणी घेण्यात आली होती. यंदा दोन्ही पद्धतीने ही चाचणी घेण्यात येईल.

हेही वाचा- 'एमएचटी सीईटी' परीक्षेची गुणपद्धती जाहीर

या चाचणीच्या माध्यमातून दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घेण्यास पालक तसंच शिक्षकांना मदत होईल. या कलमापन चाचणीनुसार एखाद्या क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्याकडे त्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुरेशा क्षमता आहेत का ? हे पाहण्यासाठी अभिक्षमता चाचणी घेण्यात येतात.  

कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचं मापन केलं जाईल.  अभिक्षमता चाचणी भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या ४ क्षमतांचं मापन करते. या चाचणीसाठी वेळेची मर्यादा आहे. भाषिक क्षमता परीक्षणासाठी १५ मिनिटे व तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी प्रत्येकी २० मिनिटे दिली आहेत.

हेही वाचा- 'सीएस' परीक्षेतील २ पेपर ढकलले पुढे, कारण अस्पष्ट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा