Advertisement

दहावीचा निकाल ‘या’ आठवड्यात?

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाने अद्याप निकालाची नेमकी तारीख स्पष्ट केली नाही.

दहावीचा निकाल ‘या’ आठवड्यात?
SHARES

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाने अद्याप निकालाची नेमकी तारीख स्पष्ट केली नाही. दहावीच्या निकालाची तारीख काही दिवसांत जाहीर केली जाईल.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. याआधी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील दहावीचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती दिली होती.

हेही वाचा- दहावीचा निकाल जुलैमध्ये लागणार?

निकाल कुठे पाहाल?

निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने यंदा दहावीची परीक्षा रद्द केली होती. राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.

‘असे’ मिळतील गुण

दहावीचे गुणदान करताना पहिल्या ५० गुणांसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या १००पैकी असलेल्या गुणांचे शाळास्तरावर ५० टक्के गुणांत रूपांतर करायचं आहे. उरलेल्या ५० गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या अंतर्गत लेखी गुणांचे ३० गुणांत रूपांतर करायचं आहे.

अपवादात्मक परिस्थितीत जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परीक्षा झाल्या नसतील तर दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, स्वाध्याय यांचं ३०पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

(SSC result might declare in second week of july 2021)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा