Advertisement

बारावीच्या निकालानंतरच प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्णय-उदय सामंत

१२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचं धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरेल.

बारावीच्या निकालानंतरच प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्णय-उदय सामंत
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १२ वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. १२ वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्या अनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रवेशाचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

इस्लामपूर येथील तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष पदवी प्रवेशासंदर्भात दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक उपस्थित होते.

हेही वाचा- राज्यातल्या १२वीच्या परीक्षा अखेर रद्द!

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) म्हणाले, १२ वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो. यासाठी सीईटी परीक्षा महत्त्वपूर्ण असते. या सीईटीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. १२ वी चा निकाल लागल्यानंतर  त्वरित प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळतील अशा काही अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल याबाबत निर्णय घेण्यात येतील. 

तंत्रशिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै – ऑगस्ट पर्यंत चालते. तसंच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार यावेळी करण्यात येईल. १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचं धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरेल.

गेल्या आठवड्यात राज्यातल्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पाठोपाठ राज्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी विनाअडथळा प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

(maharashtra government will take decision after 12th results says uday samant)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा