Advertisement

मेगाब्लॉकमुळे एमपीएससीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले

मुंबईतील वाहतुक कोंडी, रविवारचा मेगाब्लॉक, गुर्जर आंदोलनाचा फटका एमपीएससी परीक्षा देणाऱ्या १० विद्यार्थ्यांना बसला आहे.

मेगाब्लॉकमुळे एमपीएससीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले
SHARES

गेल्या काही दिवसांपासून वाहतुक कोंडी या प्रमुख कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास उशीर होत आहे. यामुळे अनेकांना शासकीय नोकरीवर पाणी सोडावं लागत असून शिक्षण प्रशासन मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. दरम्यान मुंबईतील वाहतुक कोंडी, रविवारचा मेगाब्लॉक, गुर्जर आंदोलनाचा फटका एमपीएससी परीक्षा देणाऱ्या १० विद्यार्थ्यांना बसला आहे.


नेमक प्रकरण काय?

रविवारी १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचावं, असा एमपीएसीचा नियम आहे. या परीक्षेसाठी मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या विविध ठिकाणाहून परळच्या महर्षी दयानंद (एम डी) कॉलेजमध्ये दाखल झाले होते. सकाळी १० वाजता परीक्षा असल्यानं ९.३० च्या दरम्यान परीक्षा केंद्राचा गेट बंद करण्यात आला. रविवार मेगाब्लॉक असल्यानं परीक्षेला येणारे विद्यार्थी दोन ते तीन मिनिटं उशिरा केंद्रावर पोहोचले. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याची विनंती केली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही.

यानंतर काही वेळ विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर तिथल्या स्थानिक आमदार, कामगार संघटना, अधिकारी आणि विविध मान्यवरांना माहिती देऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चेअरमन चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधला असता ओक यांनी या विद्यार्थ्यांना रविवारी होणाऱ्या दुसऱ्या पेपरला बसायची परवानगी दिली. परंतु याचा काहीही उपयोग होणार नसून एमपीएससीच्या उमेदवारांना परीक्षेसाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

एमपीएससी या परीक्षेची वर्षभर अनेक विद्यार्थी तयारी करत असतात. परंतु विद्यार्थ्यांना अवघे काही मिनिटं परीक्षेला उशीर झाल्यानं त्यांना शासकीय नोकरीला मुकावं लागणार आहे. विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेतील मास कॉपी यासारख्या इतर अनेक भोंगळ कारभारांचा सामना विद्यार्थी निमूटपणे सहन करत असतात. तेव्हा कुठलाही नियमभंग होत नाही. पण जेव्हा विद्यार्थ्यांची अडचण होते, तेव्हा परीक्षा अधिकारी नियमावर बोट ठेवून मुजोरपणा करतात.

अमोल मदने, एमपीएससी विद्यार्थी



हेही वाचा

बीएससी तृतीय वर्षाचा निकाल जाहीर

लॉच्या विद्यार्थ्यांना १० हजार रूपयांचा दंड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा