Advertisement

शाळेतच मिळणार जातपडताळणी प्रमाणपत्र


शाळेतच मिळणार जातपडताळणी प्रमाणपत्र
SHARES

जातपडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं अाहेत.  विद्यार्थ्यांना शाळेतच जातपडताळणी प्रमाणपत्र दिलं जाणार अाहे. सध्या शिक्षण विभागात यावर विचार करत असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं होतं.  वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात येतात. मात्र, अाता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून लवकरच त्यांना शाळेतून हे प्रमाणपत्र मिळू शकेल.


असं मिळेल जातपडताळणी प्रमाणपत्र

इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्याला शाळेतच अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर दहावी परीक्षा पास होऊन बाहेर पडताना त्या विद्यार्थ्याला इतर प्रमाणपत्रासोबतच जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात येईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या विद्यार्थ्यांना हा नवा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.


बैठकांचं सत्र सुरू

जातपडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर उत्तर शोधण्यासाठी शिक्षण विभागात बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. अनेक नवीन पर्याय शोधताना यापुढे विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून अर्ज करण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे. जेणेकरून दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या हाती हे प्रमाणपत्र मिळले, ज्याचा वापर त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी करता येईल.


अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या प्रवेश नियामक मंडळ आणि सीईटी सेलतर्फे घेण्यात आला आहे. दरवर्षी हे अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात येते.  परंतू यंदापासून प्रवेशाच्या वेळीच हे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य केल्यानं हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार, असा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून त्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठात भरतोय योगाचा तास

आता बायोमेट्रि‍क पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा