SHARE

राज्यातील मराठी शाळांना १०० टक्के अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी मुंबई प्रांत विनाअनुदानित, अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी १९ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. समितीनं मांडलेल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार या समितीनं केला आहे. 


मागण्या काय ?

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना व शिक्षकांना संपवणाऱ्या शासन निर्णयातील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, मराठी शाळांना नवी संजीवनी देण्यात यावी, अनेक कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यात येत नाही तो मिळावा, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.


विविध मागण्यांसाठी समितीच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून लढा सुरू असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या समितीला दिलेलं आश्‍वासन न पाळल्यानं शिक्षकांनी आक्रमक पावित्रा धारण केला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.

- प्रशांत रेडीज, प्रदेशाध्यक्ष, विनाअनुदानित कृती समितीहेही वाचा - 

'लॉ' च्या परीक्षा ४ डिसेंबरपासून, विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर; ३०० सीसीटिव्ही फक्त कागदावर
संबंधित विषय
ताज्या बातम्या