Advertisement

शाळा अनुदानाबाबत शिक्षकांची सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक


शाळा अनुदानाबाबत शिक्षकांची सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
SHARES

२० टक्के अनुदानास पात्र असणाऱ्या सर्व शाळांना प्रचलीत नियमानुसार अनुदान द्यावं, तसंच अघोषित असणाऱ्या सर्व शाळा निधीसह घोषीत कराव्यात या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी येत्या सोमवारी शिक्षकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक आयोजीत करण्यात आली आहे. 


शिक्षकांचं आंदोलन 

 या दोन प्रमुख मागण्यांसाठी दोन दिवसांपासून शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्याशिवाय १ व २ जुलै रोजी पात्र झालेल्या ५१/१९ शाळांचा अहवाल आल्यानंतर अनुदान देण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी, शाळा व कॉलेजात नैसर्गिकरित्या वाढ झालेल्या तुकड्यांचे मूल्यांकन करावं या मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. 


शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

या मागण्यांबाबत शुक्रवारी २३ नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आल्या. या चर्चेसाठी शिक्षण परीषद अध्यक्ष अनिल बोरनारे व महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांसह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं सर्व शिक्षकांना शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिलं.


शिक्षणमंत्री, अर्थमंत्री उपस्थित 

त्याशिवाय शिक्षकांच्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, शिक्षक आमदार, वित्त सचिव व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.



हेही वाचा - 

आनंदी बालपणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, क्राय संस्थेचा जागतिक विक्रम

येत्या ९ डिसेंबरला होणार सीटीईटी परीक्षा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा