Advertisement

येत्या ९ डिसेंबरला होणार सीटीईटी परीक्षा

सीटीईटी परीक्षेत दोन गट करण्यात आले असून पहिला गट पहिली ते पाचवीपर्यंत इयत्तेपर्यंत शिक्षक होणाऱ्यांसाठी तर दुसरा गट सहावी ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी असणार आहे.

येत्या ९ डिसेंबरला होणार सीटीईटी परीक्षा
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) शाळांसाठी घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) येत्या ९ डिसेंबरला होणार आहे. ९२ शहारातील २ हजार २९६ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.


'असे' असतील पेपर

सीटीईटी परीक्षेत दोन गट करण्यात आले असून पहिला गट पहिली ते पाचवीपर्यंत इयत्तेपर्यंत शिक्षक होणाऱ्यांसाठी तर दुसरा गट सहावी ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी असणार आहे. या दोन्ही गटासाठी २ विविध पेपर होणार असून एक पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर २ ते ४.३० या वेळेत घेण्यात येणार आहे.


ओळखपत्र देणार

www.ctet.nic.in या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उद्या म्हणजे २२ नोव्हेंबरपासून ओळखपत्र उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर लॉगइन करून ओळखपत्राची प्रत घ्यावी लागणार असून याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोणतेही ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र वेबसाईटवर उपलब्ध नसतील त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरण्यास शेवटची संधी देण्यात येणार असून त्यांना सीटीईटी युनिटमध्ये संपर्क साधता येणार आहे.हेही वाचा-

'लॉ' कॉलेजची मनमानी, सोशल मीडियावर कॉलेजचं नाव वापरण्यास बंदी

शासनाचा निषेध करण्यासाठी शिक्षकांचं मुंडण आंदोलनRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा