Advertisement

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ


दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
SHARES

राज्य सरकारने १८० तालुक्‍यात गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार या भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.


मदतीची घोषणा

काही दिवसांपूर्वी १८० तालुके दुष्काळसदृश असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर या भागातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर योजना, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थिगती, जमीन महसुलातून सूट यांसारख्या विविध मदतीची घोषणा करण्यात आली होती. 


हजारो विद्यार्थ्यांना फायदा 

त्यानुसार नुकत्याच काढलेल्या निर्णयानुसार याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबच्या सूचना उच्च शिक्षण संचालकांना देण्यात आल्या आहेत. तसंच वन व महसूल विभागानं जाहीर केलेल्या २६८ महसुली मंडळातील दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांनाही शुल्क सवलत लागू होणार असल्याचं या निर्णयात जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.



हेही वाचा - 

विनाअनुदानित शिक्षकांचा आक्रमक पवित्रा, सोमवारपासून बेमुदत आंदोलन

'लॉ' च्या परीक्षा ४ डिसेंबरपासून, विद्यार्थ्यांना दिलासा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा