Advertisement

लॉ परीक्षेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ, ५ मार्काचा चुकीचा प्रश्न


लॉ परीक्षेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ, ५ मार्काचा चुकीचा प्रश्न
SHARES

सोमवारी झालेल्या लॉ च्या पेपरमध्ये तब्बल २५ गुणांचे चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याचं प्रकरण ताजं असताना बुधवारी झालेल्या लॉ च्या पेपरमध्ये पुन्हा एकदा ५ मार्काचा चुकीचा प्रश्न विचारण्यात अाला.  आतापर्यंत झालेल्या तिन्ही पेपरमध्ये काहीना काही गोंधळ समोर येत आहेत. 


नेमकं प्रकरण काय?

गुरूवारी ३ जानेवारीपासून लॉ (विधी) शाखेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या एल.एल.बी सेमिस्टर पाच परीक्षा सुरू झाली आहे.  या परीक्षेतील कायद्याचा अन्वयार्थ हा १०० गुणांचा पेपर बुधवारी झाला. १०० गुणांच्या या पेपरमधील मराठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दोन मधील एक प्रश्न चुकीचा देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी काही वेळासाठी गोंधळात पडले होते. यावेळी चुकांची दुरूस्ती पेपर संपायच्या अर्धा तास आधी करण्यात आली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. 


परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना आधीच टेन्शन असतं. त्यात लॉ ची परीक्षा सुरू झाल्यापासून दरदिवशी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोंधळांना सामोरे जावं लागत आहे. याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अद्याप कोणतीही ठोस भुमिका घेतली नसून त्यांनी ती लवकरात लवकर मांडावी.

 - सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा - 

लॉ च्या परीक्षेत २५ गुणांचे प्रश्न चुकीचे

धक्कादायक : विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी लघुशंकेस जाण्यास मनाई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा