Advertisement

आर. डी. बर्मन यांच्या या 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?


आर. डी. बर्मन यांच्या या 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
SHARES

विविध संगीतकलांचा एकत्रित वापर करुन वेगळे प्रयोग करणारे, भारतीय सिनेसृष्टीतील आवाजाचे जादूगार संगीतकार पंचमदा म्हणजेच, आर. डी. बर्मन! त्यांचा जन्म 27 जून 1939 रोजी कोलकातामध्ये झाला. 'शोले'मधील 'मेहबुबा ओ मेहबुबा' या गाण्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीसोबतच रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.

आर. डी. बर्मन यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 300 सिनेमांना संगीत दिले. हिंदी सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी बंगाली, तेलुगु, तामिळ, उडिया आणि मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे.



1) शाही वंशज

आर. डी. बर्मन यांचे वंशज त्रिपुरातील राजघराण्यातले होते. आर. डीं.चा जन्म कोलकात्यात झाला. त्यांचे आई-वडील त्यांना लाडाने तबलू म्हणत. त्यांच्या काळात प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांना 'पंचम' हे नाव दिले.


2) वयाच्या नवव्या वर्षी तयार केले पहिले गाणे

आर. डी. बर्मन 9 वर्षांचे असताना 'अरे मेरी टोपी पलट कर आजा' हे पहिले गाणे त्यांनी तयार केले. ज्याला त्यांच्या वडिलांनी फंटुश (1956) या चित्रपटात वापरले. 'सर जो तेरा चकराए' हे गाणं देखील त्यांनी लहान वयातच तयार केले. यालाही त्यांच्या वडिलांनी गुरु दत्त यांच्या 'प्यासा' (1957) सिनेमात वापरले.


3) संगीत वाद्ययंत्राची लहानपणापासूनच आवड

आर. डी. यांना लहानपणापासूनच संगीताची ओढ होती. 'सोलवा साल' या सिनेमातील 'है अपना दिल तो आवारा' या गाण्यासाठी देखील त्यांनी माऊथ ऑर्गन वाजवले होते.


4) 'आराधना'साठी पंचमदांचे संगीत

एका स्वतंत्र संगीतकाराच्या स्वरुपात पंचमदा यांनी 'छोटा नवाब' (1961) या सिनेमात अॅक्टिंग केली. 1959 मध्ये गुरु दत्त यांच्यासोबत राज या सिनेमात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पण 'छोटा नवाब'मध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना कधीही मागे वळून पाहिलेच नाही.


5) आवाजाचे जादूगार

आर. डी. बर्मन पश्चिमात्य, लॅटिन, ओरिएंटल आणि अरबी संगीताने फार प्रभावित होत. त्यांनी सँड पेपरला घासून आणि बांबूच्या छडीचा वापर करुन वेगवेगळे आवाज काढण्याचे प्रयोगही केले. 'मेहबूबा, मेहबूबा' या गाण्याला सुरुवातीची धुन देण्यासाठी त्यांनी बीअरच्या बाटल्यांचा वापर केला होता.


6) हिंदी चित्रपटासाठी लिहिले पहिले इंग्रजी गाणे

पंचमदा यांनी 1975 मध्ये 'दीवार' या सिनेमासाठी चक्क इंग्रजीत गाणे लिहिल्याचे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल! पण हे खरे आहे. चित्रपटातील एका दृश्यात जेव्हा अमिताभ बच्चन पहिल्यांदाच परवीन बाबीला भेटतात, तेव्हा पंचमदांनी लिहिलेले हे इंग्रजी गाणे बॅकग्राऊंडला वाजते.


7) पंचमदांचे खासगी जीवन

1972 मध्ये 'परिचय' सिनेमातील 'मुसाफिर हूं यारों' हे गाणे पंचमदा यांनी गायले आहे. पहिली पत्नी रीटा पटेल हिच्याशी विभक्त झाल्यानंतर ते एका हॉटेलात रहात होते. तेव्हा त्यांनी हे गाणे गायले होते. तेच गाणे पुढे 'परिचय' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा